पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येचा पनवेल मधील पत्रकारांनी केला तीव्र निषेध..
पनवेल मधील पत्रकारांनी केला तीव्र निषेध..

पनवेल वैभव वृत्तसेवा : - 
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची  झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय मराठी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या आव्हानानुसार संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. 

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती, पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी तहसीलदार विजय तळेकर यांना पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या आणि राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्याच्या निषेधाचे पत्र दिले तसेच काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. यावेळी जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोतदार, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव अनिल भोळे, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच चे, सचिव मंदार दोंदे, संजय कदम, भालचंद्र जुमलेदार, सय्यद अकबर, राजेश डांगळे, अनिल कुरघोडे, सुनील कटेकर, रवी गायकवाड, अमित, राजू गाडे, गणपत वारगडा, शंकर वायदंडे, वसीम पटेल, हनिफ कच्छी आदी पत्रकार उपस्थित होते.
Comments