महादेवाची महाआरती....
पनवेल / दि.१९ (संजय कदम) : कळंबोली बिमा नाक्यावर शिवसेनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त महादेवाची महाआरती करण्यात आली. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण देण्याचा निर्णय घेतल्याने महाशिवरात्रीनिमित्त शिवसेनेने महापूजा करून आनंद साजरा केला. यावेळी पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
पनवेल तालुक्यात महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मंदिरामध्ये शिवभक्तांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दरम्यान कळंबोली बिमा नाक्यावर शिवसेनेच्या वतीने महादेवाची महाआरती करण्यात आली. मोठ्या भक्ती भावाने शिवसैनिकांनी महादेवाची आराधना केली. त्यामुळे या परिसराचे वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक विलासशेठ कदम, अरुण तरंगे, उपमहागर संघटक आबासाहेब लकडे, लहुशेठ मलकमिर शंकरशेठ वीरकर, पक्षाचे कळंबोली शहराध्यक्ष तुकाराम सरक, अमृत तरंगे, रणजीत फडतरे, दत्ता शिंदे, शरद कदम, कासले, अल्पेश माने यांचा सह शिवशंकर भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त बिमा नाक्यावर भाविकांना उपवासाची खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले.
फोटो : महाशिवरात्री निमित्त कळंबोली बिमा नाक्यावर महादेवाची महाआरती