पनवेल / (अनिल कुरघोडे ) : -
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पनवेल शहर शाखेच्यावतीने शिवसंवाद यात्रा आढावा बैठक पनवेल शहर शाखेत शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आजी माजी पदाधिकारी जेष्ठ शिवसैनिक,कार्यकर्ते यांची मोठया प्रमाणात गर्दी होती. यावेळी जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, निरीक्षक वैभव सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
शिवसंवाद यात्रा पनवेल शहर येथे दिनांक ४ मार्च रोजी ३.३० वाजता काळण समाज हॉल येथे मा. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे. त्या संबंधीत मार्गदर्शन सध्याची राजकीय परिस्थिती संदर्भात आढावा बैठक शिवसेना शाखेत घेण्यात आली.
यावेळी निरीक्षक वैभव सावंत, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, रामदास पाटील उपजिल्हा प्रमुख, भरत पाटील उपजिल्हा प्रमुख, एकनाथ म्हात्रे महानगर प्रमुख, दीपक घरत उपमहानगर प्रमुख, प्रवीण पोपटराव जाधव शहर प्रमुख आणि मोठ्या संख्येने पदाधीकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.