डॉक्टर केतकी पाटील म्हस्के "युथ आयकॉन" अवॉर्ड ने सन्मानित ....
भोपाळ येथील अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञांच्या परिषदेत करण्यात आले सन्मानित...

पनवेल वैभव वृत्तसेवा  : - डॉक्टर केतकी पाटील म्हस्के यांचा गौरव भोपाल येथील अखिल भारतीय स्त्री रोग तज्ञांच्या कॉन्फरन्स मध्ये आय एस ए आर (ISAR) Indian society of Assisted Reproduction Technics ) युथ आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले , 4 फेब्रुवारी रोजी भोपाल येथे मध्य प्रदेशच्या चे आरोग्य मंत्री आदरणीय प्रभू राम चौधरी यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला.
डॉक्टर केतकी पाटील म्हस्के या पनवेल येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ञ तसेच टेस्ट ट्यूब बेबी स्पेशालिस्ट व लॅपरोस्कोपिक सर्जन अशा विविध क्षेत्रातील जबाबदाऱ्या सांभाळत आहेत, त्यांनी गेली नऊ वर्ष आयर्लंड मध्ये डब्लिन येथे स्त्री रोग तसेच लॅप्रोस्कोपी व टेस्ट ट्यूब बेबी या क्षेत्रात दीर्घ अनुभव घेतला आहे ,तसेच लंडन येथे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून त्यांनी आय व्ही एफ म्हणजेच टेस्ट ट्यूब बेबी क्षेत्रात फेलोशिप करून प्राविण्य मिळवले आहे व आता त्या पूर्णवेळ टेस्ट ट्यूब बेबी स्पेशालिस्टोपिक सर्जन म्हणून लाईफ लाईन हॉस्पिटल तसेच खारघर वाशी ठाणे डोंबिवली आणि पुणे येथे कार्यरत आहेत.
त्या नेहमी देशात व विदेशातील विविध या क्षेत्रातील कॉन्फरन्स मध्ये भाग घेत असतात व त्यांचे शोध निबंध प्रस्तुत करत असतात , या क्षेत्रातील डॉक्टर प्रकाश पाटील एक नामवंत श्री रोग तज्ञ व टेस्ट बेबी स्पेशालिस्ट यांच्या विविध टेस्ट ट्यूब बेबी  केंद्रांमध्ये दहा हजार पेक्षा जास्त टेस्ट बेबी चा जन्म आतापर्यंत झालेला आहे व तोच यशस्वी वारसा त्यापुढे चालवत आहेत , त्यांचे पती डॉक्टर अभितेज म्हस्के हे देखील डब्लिन व लंडनमध्ये नऊ वर्ष अस्थिरोग तज्ञ व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन या क्षेत्रात अनुभव घेऊन दोघेही स्वदेशात परतून आपल्या लोकांना त्यांच्या सेवेचा लाभ देण्यासाठी फायदेशी परत येऊन सेवा प्रधान करत आहेत.
Comments