विठ्ठलवाडीत महाशिवरात्री उत्साहात साजरी...


मा.सभागृहनेते परेश ठाकूर यांनी घेतले दर्शन...
पनवेल, प्रतिनिधी -- पनवेल तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  मंदिरात सकाळी पाहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगच-रांग लागली होती. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अजय बहिरा यांनी घेतले दर्शन.

यावेळी हरिश्चंद्र केणी, सचिन गायकवाड, रवींद्र गायकवाड, प्रकाश जाधव, राजेश जाधव, मंदिर पुजारी दीपक दीक्षित, विष्णू भोगाडे, निशांत जोंधळे, अनिल गायकवाड, दिनेश गायकवाड, प्रथमेश गायकवाड, शुभम धादवाड, किशोर धादवाड, रोशन विश्वकर्मा, विकी जोंधले, आर्य गायकवाड, यश जाधव, अभिष वर्गिस यांच्यासह गायकवाड परिवार मंदिर व्यवसाथापक उपस्थित होते. 

विठ्ठलवाडी मंदिरात सकाळी चार वाजल्यापासूनच धार्मिक विधीला प्रारंभ करण्यात आले होते. विठ्ठलवाडी मंदिर जागृत देवस्थान मानले जाते. यावेळी मंदिरामध्ये दिवसभर भजन, किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर व यात्रेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच रस्त्याच्या दुतर्फा उत्सवात खेळणी, कपडे, विविध प्रकारची मिठाइचे दुकाने, पाळणे यांनी लहान मुलांसाठी खास आकर्षित करत होते. उत्सवात योत्रोत्सवाचा लाभही भाविकांनी घेतला. भाविकांची गर्दी लक्षात घेता, कुठलीही विपरीत घटना घडू नये यासाठी यावेळी पनवेल शहर पोलिसांनी कडक बंदोबस्त करण्यात आला होता.  

मोफत फराळ वाटप

दरवर्षीप्रमाणे विठ्ठलवाडी मंदिरामध्ये भाविकांची उसळलेली गर्दी, त्याचबरोबर  मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांनी उपवास फराळाचा लाभही घेतला.
Comments