महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांसाठी विशेष परवानगी द्या : आ.प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणी ..
आ.प्रशांत ठाकूर यांची विधिमंडळात मागणी.. 

पनवेल /(प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने राज्यात दिनांक १४ ते १६ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शासनाने विशेष परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाकडे केली. 
      आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडताना म्हंटले कि, येत्या १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. शिंदे- फडणवीस सरकार या राज्यामध्ये आले, तेव्हापासून अनेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होत आहेत. १४ एप्रिल रोजी अनेक आंबेडकरी अनुयायी सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व पद्धतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. यंदा १४ एप्रिलला शुक्रवार तर १५ एप्रिल शनिवार आणि १६ तारखेला रविवार येत आहे.  जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असते, त्यामुळे सर्व अनुयायांची या तीनही दिवस कार्यक्रमांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगीची मागणी आहे, त्या अनुषंगाने दिनांक १४ ते १६ एप्रिल पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत राज्यात शासनाने विशेष परवानगी द्यावी, आणि त्या संदर्भात शासनाने घोषणा करावी, असेही या औचित्याच्या मुद्यावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image