अज्ञात कारणाने तरुणाची कुऱ्हाडीने हत्या...
अज्ञात कारणाने तरुणाची कुऱ्हाडीने हत्या...


पनवेल / दि.२९ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील शिवकर येथे एका अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने एका अल्पवयीन तरुणाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ घडली आहे.
               विनय विनोद पाटील असे या अल्पवयीन तरुणाचे नाव असून त्याची मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने कुऱ्हाडीच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले होते. सदर हत्या कोणी व कोणत्या उद्देशाने केली असावी याचा शोध घेण्याचे आवाहन पनवेल शहर पोलिसांसमोर आहे.
Comments