पत्रकारितेची परंपरा जपणारा पनवेल टाइम्स - तहसीलदार विजय तळेकर..
पनवेल टाइम्सच्या गुढीपाडवा विशेषकांचे प्रकाशन..
   
पनवेल - पत्रकारितेची परंपरा पनवेल टाइम्सने जपली असल्याचे गौरवोद्गार पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या गुढीपाडवा  विशेषांकाच्या प्रकाशनवेळी काढले.
         पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या शुभहस्ते पनवेल टाइम्सच्या गुढीपाडवा विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विजय लोखंडे, माजी नगराध्यक्ष मदन कोळी, उरणचे तहसीलदार खोले, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू आदी पत्रकार उपस्थित होते.
     पनवेल येथून प्रकाशित होणाऱ्या पनवेल टाइम्सने ऐतिहासिक आणि पत्रकारितेचा वारसा जपला आहे.आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय घडामोडी ठळकपणे प्रसिद्ध करणाऱ्या या वृत्तपत्राने अप्रकाशित व्यक्ती, घटना-प्रसंग यांना वेगवेगळ्या विषयांवरील विशेष अंक प्रकाशित करून न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी केले. यावेळी पत्रकार भालचंद्र जुमलेदार,मयूर तांबडे, साहिल रेेळेकर,लक्ष्मण ठाकूर, राज भंडारी,शंकर वायदंडे, संजय पवार आदी उपस्थित होते.
Comments