महिला दिनानिमित्त आश्रमातील मुलांना विविध वस्तूंचे वाटप...
पनवेल / प्रतिनिधी - : जागतिक महिला दिनानिमित्त खांदा कॉलनी येथील बालग्राम आश्रम आणि तक्का, पनवेल येथील स्वप्नालय, मुलींचे बालगृह येथील मुलांना विविध वस्तूंचे वाटप पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, त्यांच्या पत्नी रश्मी सोनवणे आणि पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आश्रमातील गरजू महिला व मुली यांना सॅनिटरी नॅपकिन तसेच जीवनावश्यक साबण, हॅन्ड वॉश, तेल, ब्रश, टूथपेस्ट अशा वस्तूंचे वाटप सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भागवत सोनवणे, त्यांच्या पत्नी रश्मी सोनवणे, पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मोनाली चौधरी, महिला पोलीस हवालदार नीलिमा म्हात्रे, शशिकांत काकडे यांचे उपस्थितीत करण्यात आले. येथील महिलाना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्याना गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी स्वप्नालयाच्या अधीक्षिका शिल्पा मॅडम, बालग्राम आश्रमाचे विनायक पाटिल यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.