नील हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा ...
पनवेल / प्रतिनिधी - : नील हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वीर वुमन फाउंडेशनच्या अर्चना परेश ठाकूर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. बीके डॉ शुभदा नील स्त्री रोगतज्ञ, नील हॉस्पिटल यांनी स्वास्थ्य, संपदा व खुशी ह्या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. मंगला गडमुळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी महिलांची निःशुल्क एचबी व डायबिटीज स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाला चारुशीला घरत माजी उप महापौर, जीएस फाउंडेशन, ऍड. वृषाली वाघमारे माजी नगरसेविका, जय बजरंग महिला मंडळ, नैना बांठिया, आनंद धार्मिक ग्रुप, अमिता चौहान राजपूत, डॉ स्वाती लिखिते - रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिट, राजश्री वावेकर माजी नगरसेविका, प्रीती जॉर्ज माजी नगरसेविका, मंगला गडमुळे व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा नंतर नील हॉस्पिटल, नवीन पनवेल येथे मंगळवार ते गुरुवार, 7 से 9 मार्च 2023 या काळात सांयकाळी 4 से 5 वाजता नि:शुल्क मेडिटेशन कोर्स घेतला जाणार आहे. तरी सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती डॉ शुभदा नील यांनी केली आहे.