विवाहिता बेपत्ता....
पनवेल / दि.२४ (वार्ताहर) : तालुक्यातील कोन गाव येथून एक विवाहित महिला कोणास काही न सांगता आपल्या राहत्या घरातून कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मिनारा बेबी अब्दुल रशिद खान असे या महिलेचे नाव असून तिचे वय २६ वर्षे, रंग सावळा, उंची ५ फुट, नेसुन पिवळया रंगाचा टॉप व काळया रंगाची लेगिन्स घातलेली आहे. तिला मराठी, हिंदी, बंगाली, भोजपुरी भाषा बोलता येत असून नाकात सोन्याची चमकी, पायात पैजन व काळया रंगाची सॅन्डल घातलेली आहे. तसेच तिच्या डाव्या बाजूच्या कानाची पाळी कापल्याची जूनी खुन आहे. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार अमर भालसिंग यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो : बेपत्ता मिनारा खान