सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...
सकल मराठा समाजाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी...

पनवेल दि. १४ ( वार्ताहर ) : सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी च्या वतीने आज मराठा समाज कार्यालय खांदा कॉलनी येथे छत्रपती संभाजी महाराज यांची  जयंती साजरी करण्यात आली . 
                  या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाज मंडळ पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव साजरा केला.  या प्रसंगी खांदा कॉलनी सह पनवेल परिसरातील शंभू प्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती . 
फोटो- सकल मराठा समाज मंडळ च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज  जयंती
Comments