अमृता भगतला कांस्य पदक....
पनवेल / वार्ताहर - : तामिळनाडू येथील कुट्रालम या ठिकाणी राष्ट्रीय सब ज्युनिअर आणि ज्युनिअर (मुले/मुली) इक्वीप पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धा १२मे २०२३ ते १७ मे २०२३ या कालावधीत झाली. या स्पर्धेत ज्युनियर४७ किलो वजनी गटात "अमृता ज्ञानेश्वर भगत"रायगड (शेलु- कर्जत) हिने महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिग संघातर्फे भाग घेऊन "कांस्य"पदक प्राप्त केले आहे. तिने एकूण २९२.५किलो वजन उचलेले. तसेच ८४ किलो वजनी गटात खोपोलीची"प्रणाली आनंद माने" (केएमसी,कॉलेज)ही सहभागी झाली होती. तिने २५०किलो वजन उचलून पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
रायगडच्या खेळाडूंचे कामगिरी बाबत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिग् असोसिएशनचे सेक्रेटरी, आंतरराष्ट्रीय पंच,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी समाधान व्यक्त केले आहे. स्पर्धेत अमृता भगत हिला रायगडचे खेळाडू विक्रांत गायकवाड,सुरज धिमल आणि प्रणाली माने हिला क्रीडाप्रेमी असलेले तिचे काका विश्वनाथ माने यांचे मोलाचे सहकार्य झाले. "पॉवरलिफ्टींग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडचे अध्यक्ष गिरीष वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, खजिनदार राहुल गजरमल, सुभाष टेंबे (माणगाव) माधव पंडित,संदीप पाटकर,दत्तात्रय मोरे,(कर्जत),श्रीनिवास भाटे(महाड),मानस कुंटे(अलिबाग) या पदाधिकारी यांनी आनंद व्यक्त केला आहे.