बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक....
बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना अटक....


पनवेल दि.२९ (वार्ताहर) : पनवेलच्या तालुक्यातील कोन गाव परिसरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली. या कारवाईत एक पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 
              पनवेलच्या कोन भागातील अवधूत बिल्डिंगमध्ये काही बांग्लादेशी राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांनी त्यांना पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक नीलम पवार आणि त्यांच्या पथकाने शाबीर बाबू मुल्ला (१९), तुनतुनी खानम मंडल (३४) आणि सोनाली अजुमूल शेख (२९) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीमध्ये सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी बांगलादेशातील उपासमारीला कंटाळून भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली. हे नागरिक बांधकाम साईटवर मजुरी आणि घरकाम करून सहा महिन्यांपासून या ठिकाणी राहत असल्याचे तपासात आढळून आले. त्यानुसार या सर्वांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
Comments