गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणाऱ्या पथकाचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले कौतुक..
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले कौतुक..   

पनवेल दि.३१ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्तलयातील परिमंडळ १ व परिमंडळ २ विभागात दाखल झालेल्या किचकट गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व फरार आरोपींचा शोध घेणाऱ्या विशेष पथकाचा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष सत्कार करून कौतुक केले आहे.  
           परिमंडळ १ व परिमंडळ २ विभागात अनेक किचकट गुन्हे प्रलंबित आहेत. तर काही गुन्ह्यातील आरोपी कित्येक वर्ष फरार आहेत. अश्या आरोपींचा शोध घेण्याकामी तसेच सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नुकतेच एक पथक स्थापन केले होते. या पथकाने अवघ्या काही दिवसातच आपल्या शोध कामाचा आलेख वाढवून सदर पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पाहिजे २९ व फरारी १० असे एकूण ३९ आरोपी यांचा शोध लावला. सदर पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष धनावडे, पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार विजय पाटील, जगदीश पाटील, पोलीस नाईक प्रवीण मेथे, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस सहआयुक्त संजय मोहिते यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
Comments