खरा ढाण्या वाघ दत्ता जाधव च - रमेश गुडेकर...
खरा ढाण्या वाघ दत्ता जाधव च - रमेश गुडेकर..

पनवेल दि.१८ (वार्ताहर) : पनवेल मधील सर्वात जुने व प्रसिध्द असलेले लाईन आळीतील शिवाजी युवक मंडळ याची सालाबादप्रमाणे सत्यनारायणाची महापूजा मोठया उत्साहाने पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन रायगड जिल्हा शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मंडळाचे सदस्य असलेले कै. दत्ता जाधव यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. 
                  यावेळी बोलताना रमेश गुडेकर म्हणाले कि, कै. दत्ता जाधव हे पुर्वी पनवेल शहर शिवसेना शहर शाखा प्रमुख होते त्यांच्या मंडळाच्या व्यासपिठावर सोबत असताना दत्ता जाधव ची आठवण नाही आली तर त्या कार्यक्रमाला काही अर्थ नाही. कारण या पनवेलमध्ये आय. टी. आय. मध्ये १९७० मध्ये मला प्रवेश दत्ता जाधव मुळेच मिळाला नंतर मी त्याचा सहकारी झालो विष्णु महाडीक आणि मी दत्ता जाधव यांच्याबरोबर शिवसेनेचे काम करु लागलो. त्यानंतर १९७४ साली मी आणि दत्ता जाधव शिवसेनेचे नगरसेवक झालो आणि लाईनआळी मध्येच शिवसेना शाखा असल्यामुळे त्या कार्यालयातुन आम्ही गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वहया व पुस्तके वाटप करीत राहिलो त्यावेळी पनवेल मध्ये शे.का. पक्षाचे वर्चस्व असल्यामुळे दत्ता जाधव एकाकी त्यांच्याविरुध्द काम करीत असत ते मी पाहिलेले आहे. त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर आणि व्यक्तिमत्वावर भारावून जावुन मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकुन माझी शिवसेनेची पुढील वाटचाल सुरु ठेवली पुर्वी मला व्यक्तीगत सांगायला अभिमान वाटतो की, शिवाजी युवक मंडळ मला अनेक वर्षे आदराने मला हया आपल्या कार्यक्रमाला बोलावतात आणि मला या कार्यक्रमास येण्यासही आनंद वाटतो कारण इथला तरुण वर्ग उत्साहाने कार्य करीत असतात. तसेच ते आपला हा उत्सव / कार्यक्रम आपल्याकडुन स्वतः च्या वर्गणीने पार पाडत असतात. हा कार्यक्रम पार पाडीत असताना कोणत्याही प्रकारचा भांडण तंटा न होता आम्ही या समाजाचे काही देणे लागतो हि भावना त्यांच्यात दिसून येते. अशा ग्रुपमध्ये मला सुध्दा काम करण्याची संधी मिळते. हे मी माझे भाग्य समजतो. मी अनेक ठिकाणी काम करीत असतो. काही ठिकाणी तर माकडांची माणसे बनवली आणि माणसांचे सरदार पण आज तेच सरदार कुठेतरी ग्रुप करुन दारुच्या अड्डयावर आपले नेतृत्व शोधत असतात आणि आम्ही केलेल्या सांधिक भावनेतुन एकजूट ही ते रसतळाला मिळवितात. आज इतिहासामध्ये नविन नविन दाखले निर्माण केले जातात. परंतु आम्ही ज्या व्यक्तीमत्वाला भारावुन छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्रपूर्व काळातील स्वातंत्रवीर सावरकर, लोकमान्य टिळक, ज्योतीबा फुले यांची स्फुर्ती घेवुन आम्ही आमचे काम करीत आहोत त्यामुळे कोण काय इतिहास लिहीतो हे पाहण्याची तुम्हा आम्हाला गरज नाही. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए अशा या ब्रिदवाक्याने आपण सर्व तरुण वर्गाने चालायला पाहिजे. आपली स्वत:ची स्वप्न आपण पाहिली पाहिजेत आणि त्याप्रमाणेच मार्गक्रमण केले पाहिजे. कोणाच्या अस्तित्वाला घाबरण्याचे कारण नाही. यापुढील ७५ वी आपल्या कार्यक्रमाची आपण साजरी करीत आहात ही आनंदाची गोष्ट असून त्यामध्ये आपल्याला माझे संपुर्ण सहकार्य असेल आणि आपण असेच कार्य करीत राहा असे मला वाटते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संजय मुरकुटे, किरण भेंडे, शिवराज साखरे, निखिल नाईक, योगेश भोमकर, जयवंत जोशी, शेखर म्हात्रे, जतिन भेंडे, विजय टेंबे, विकास भेंडे, राकेश मुरकुटे, दिपक शेटे, राजा साखरे, विकास म्हात्रे यांनी फार मोठे परिश्रम घेतलेले आहेत.
फोटो : सत्कार करताना व मनोगत व्यक्त करताना रमेश गुडेकर
Comments