श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम....
श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नढाळ येथे वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम....

पनवेल : श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठया उत्साहाने करण्यात आले. पनवेलचे माजी नगराध्यक्ष, शिक्षणप्रेमी, उद्योगपती, दानशूर जे.एम. म्हात्रे आणि त्यांचे चिरंजीव प्रितम म्हात्रे यांनी खालापूर तालुक्यात नढाळ येथे श्री गणेश, श्री साई श्रबाबा,म रुती, भगवान श्री शंकर शिवलिंग आणि आई भवानी माता मंदिराची स्थापना केली आहे. मंदिराच्या स्वागत कमानीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिराचा आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पनवेल उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ही मंदिर म्हणजे धार्मिक लोक आणि भक्तांचे श्रद्धास्थान असून धार्मिक पर्यटन स्थळ झाले आहे. दररोज या ठिकाणी अनेक भक्तजन याठिकाणी दर्शनाला येत असतात, तर येथील असलेल्या सुंदर बागेत अनेक लहान मुले खेळत असतात. या परिसरातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून परिचित झाले आहे. आज प्रथम वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचाही लाभ अनेकांनी घेतला.. आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गजानन महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ऊपलब्ध झाल्याने अनेकांनी पादुकांचे दर्शन घेतले. तर संगित भजनांचा आनंद देखील अनेकांनी घेतला. दुपारी महाप्रसाद देण्यात आला. जे. एम. म्हात्रे व प्रितम म्हात्रे हे आवर्जून सर्वांचे स्वागत करीत होते.
Comments