चिरनेर दहावी 1985 च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक स्थळांना भेट...
चिरनेर दहावी 1985 च्या  विद्यार्थ्यांची  ऐतिहासिक स्थळांना भेट...

पनवेल वैभव वृत्तसेवा :- 
मैत्री कशी जपावी हे आदर्श उदाहरण  सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी 1985 ग्रुप च्या विद्यार्थी मित्रांकडून शिकावे.
1985 साली दहावीच्या विखुरलेल्या  ग्रुपच्या मित्र मैत्रिणीना ग्रुपचे अडमीन पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी व्हाट्स अँप च्या माध्यमातून एकत्र आणले.आणि यानंतर सुरु झाले गेट 2 गेदर आणि ऐतिहासिक सहली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ,रयतेचे राजे  छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणे दरवेळी सहलीत पहायची हा ग्रुपचे अडमीन मिलिंद खारपाटील यांचा विचार सर्वाना पटला .शनिवार आणि रविवार दि 10 आणि 11 जून रोजी च्या सहलीत चौक नधाळ  येथील पंचायतन मंदिर, छत्रपती संभाजी महाराज यांचया दुधाई धाराऊ माता यांचा वाडा, वाई चा गणपती आणि काशीविश्वेश्वर मंदिर, पाचगणी येथील टेबल लॅन्ड, तापोळा परिसर, महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांची तुला केलेले महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, मारजोरी पॉइंट, कैस्टल रॉक पॉईंट, श्रीरामाना वरदान देणाऱ्या पार्वती मातेचे पार्वतीपूर येथील  श्रीराम वरदायिनी मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 368 वर्षांपूर्वी बांधलेला  व आजही सुस्थितीत असलेला   येथील शिवकालीन दगडी पूल आणि स्वराज्यावर चालून आलेला  विजापूर चा सरदार अफजलखान आणि त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांना यमसदनी पाठविले तो शिवपराक्रमाने पावन झालेला प्रतापगड पहिला. धार्मिक , निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळे पाहून सर्व मित्र आनंदित झाले होते.सर्व ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय अशा घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून जात होता.सर्व मित्रांना राहण्याची उत्तम सोय ग्रुपचे अडमीन मिलिंद खारपाटील यांनी   निसर्गसौंदर्याने नटलेल्या  तापोळा येथील शेलार्स रॉयल इन हॉटेल मध्ये केली होती. गाडीत आणि वस्तीच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची गाणी आणि ऐतिहासिक पोवाडे यांनी वातावरण शिवमय झाले होते.या सहलीत मिलिंद खारपाटील,सूर्यकांत म्हात्रे,पद्माकर फोफेरकर, सुरेश केणी प्रभाकर ठाकूर , प्रकाश नारंगीकर ,  रोहिदास पाटील, सुभाष पाटील,हिरामण जोशी,प्रकाश फोफेरकर रोहिदास ठाकूर,  जगदीश घरत, चंद्रकांत गोंधळी, संजय मोकल, रवींद्र पाटील, जयवन्त नाईक, अनंत म्हात्रे आदी 17 वर्गमित्र  होते.
Comments