रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी भरत पाटील...
 पनवेलच्या अध्यक्षपदी भरत पाटील....

पनवेल,दि.११ ( वार्ताहर ): रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी भरत पाटील यांची सलग
पाचव्यांदा निवड करण्यात आली आहे.
                  रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेलविक्रेता वेलफेअर असोसिएशन पनवेल, संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये सरकार मान्य धान्य व रॉकेल विक्रेते परवाना धारकांनी यांची सलग पाचव्यांदा निवड करण्यात आली आहे. तर सल्लागार म्हणून दै.रायगड नगरीचे मुख्य संपादक व ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार व कायदेविषयक सल्लागार म्हणून जे. आर. शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी शशिकांत शेळके,सेक्रेटरीपदी भालचंद्र पगडे, सहसेक्रेटरीपदी केसरीनाथ पाटील, खजिनदारपदी नंदकुमार पाटील, सहखजिनदार म्हणून अनिल जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्यपदी दिनांक ०१/११/२००० रोजी स्थापन केलेली असून, रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेलफेअर असोसिएशन पनवेल, ता पनवेल, जि. रायगड रजिस्टर क्रमांक एफ-३६७४ (रायगड) अन्वये नोंदणी करण्यात आली आहे. मा.सहाय्यक धर्मादाय आयुक्त, रायगड बिभाग, रायगड यांच्या मान्यतेनुसार सदर संस्थेची २०२० ते २०२५ पर्यंत कालावधी करीता खालील कार्यकारिणी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.यामध्ये अध्यक्षपदी म्हणून भरत बुधाजी पाटील मनिषा नामदेव गाथाडे, मनिषा रविंद्र घरत, सुरेखा बळीराम थोरले, अनिता मोहन खुटले,अदिती अरूण म्हात्रे, स्वप्नाली उमेश परदेशी,कृष्णा महादेव भेंडे, गुरूनाथ भाऊ गडगे, राकेश नंदकुमार ठाकरे, विनायक गुरूनाथ जगे, मधूकर बाबु गरुडे यांची निवड करण्यात आली.
फोटो - भरत पाटील
Comments