मधुबन कट्टा तर्फे उरण येथे कवी संमेलन व जीवन गौरव सन्मानाचे आयोजन....
मधुबन कट्टा तर्फे उरण येथे कवी संमेलन व जीवन गौरव सन्मानाचे आयोजन....
पनवेल / प्रतिनिधी : - कोकण मराठी साहित्य परिषद उरण मधुबन कट्टा यांच्यातर्फे शनिवार दि 17 जून रोजी सायंकाळी विमला तलाव उरण येथे 92 वे कविसंमेलन आणि जीवनगौरव सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे यांच्या गीतगायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
या कार्यक्रमाला उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार , आदर्श शिक्षिका शारदा खारपाटील, पत्रकार विठ्ठल ममताबादे,अजय शिवकर मधुबन कट्ट्याचे सूर्यकांत दांडेकर सहजेष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.
 या कविसंमेलनात आदर्श शिक्षक संजय होळकर , प्रा .एल बी पाटील, सेवानिवृत्त शिक्षक भ पो म्हात्रे,निमंत्रित कवी केशव म्हात्रे,स्वागताध्यक्ष भरत पाटील,रमण पंडीत, राम म्हात्रे,भालचंद्र म्हात्रे,अनुज शिवकर आदींनी कविता सादर केल्या.या कविसंमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ नागरिक चंद्रकांत मुकादम यांना देण्यात आले होते.या कविसंमेलनात 47  कवी उपस्थित होते.यावेळच्या कवितेचा विषय होता आगमन पावसाचे-रक्षण पर्यावरणाचे.या कार्यक्रमात महामुंबई चे संपादक श्री मिलिंद खारपाटील, सौ.सिता पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.प्रा.राजेंद्र मढवी यांचे  वाढदिवसा निमित्ताने अभिष्टचिंतन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या मनोगतात कविसंमेलनाची वाहवा केली आणि शुभेच्छाही दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार म का म्हात्रे गुरुजी यांनी केले .
Comments