स्वच्छता दूतांना रेनकोट, स्लीपर' व गणवेश त्वरित देण्याची आझाद कामगार संघटनेची महापालिकेकडे मागणी....
कामगार संघटनेची महापालिकेकडे मागणी....


पनवेल दि.२३ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता विषयक कर्मचारी नियमित सुविधांपासून वंचित आहे. त्यांना पावसाळी रेनकोट, स्लीपर व गणवेश देण्याची मागणी आझाद कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेचे संस्थापक महादेव वाघमारे यांनी आरोग्य विभागाला निवेदन दिले आहे.
             पनवेल महानगरपालिकेचे ११० किमी पेक्षा जास्त क्षेत्रफळ आहे. सिडको वसाहतींबरोबरच २९ गाव व पनवेल नगर परिषदेचा त्यामध्ये समावेश आहे. पनवेल मनपाने सुरुवातीलाच सिडको कडून साफसफाई, डास निर्मूलन या सेवा हस्तांतरित करून घेतल्या. त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन ही महानगरपालिकेकडे आले. प्राधिकरणाचे स्वच्छता विषयक कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी वर्ग करण्यात आले. आजच्या घडीला जवळपास २००० स्वच्छता दूध महापालिकेकडे काम करत आहेत. रस्त्यांची साफसफाई, घंटागाडी, धूर फवारणी याशिवाय इतर कामांचा त्यामध्ये समावेश आहे. पनवेल महापालिकेने साई गणेश इंटरप्राईजेसला हे काम दिलेले आहे. या एजन्सीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकांनी मुदतवाढ दिलेली आहे. एम एस डब्ल्यू 2016 नुसार सफाई, घंटा गाडीवर काम करणाऱ्या स्वच्छता दूतांना पावसाळ्यापूर्वी रेनकोट , चप्पल  तसेच प्रत्येक वर्षी दोन जोडी गणवेश देणे क्रमप्राप्त आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांना वेळेत या सुविधा पुरविल्या जात नाहीत. जून महिना मध्यावर्ती आलेला असतानाही या आवश्यक गोष्टी कामगारांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी याविषयी आवाज उठवला आहे. त्यांनी आरोग्य विभागाच्या उपायुतांना पत्र देऊन याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्याची मागणी केली आहे.
कोट - सफाई 1500 व घंटागाडी 450 धूरफवारणी 100 असे जवळपास दोन हजार कंत्राटी कामगार महापालिकेत काम करतात. त्यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे देणे बंधनकारक आहे. या संदर्भात त्वरित कार्यवाही व्हावे म्हणून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना पत्र देण्यात आले आहे. - महादेव वाघमारे (अध्यक्ष, आझाद कामगार संघटना)
फोटो - महादेव वाघमारे
Comments