धोकादायक स्थितीतील नारळाचे झाड मा.नगरसेवक नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आले पाडण्यात ; नागरिकांनी मानले आभार...
             नागरिकांनी मानले आभार...

पनवेल दि.२९(संजय कदम): मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थितीत आलेले नारळाचे झाड माजी नगरसेवक तथा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पाडण्यात आले आहे. या त्यांच्या प्रयत्नामुळे परिसरातील रहिवाश्यांनी माजी नगरसेवक नितीन पाटील यांचे आभार मानले आहेत.
      पनवेल मध्ये गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शहरातील पटेल पार्क येथील श्रुष्टी सोसायटी जवळील नारळाचे झाड पूर्ण पणे पडायच्या स्थितीत आले होते. ही बाब तेथील रहिवाशी सूर्यकांत पंडित, प्रसाद म्हात्रे यांनी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक तथा भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. घटनेचे गार्भीय लक्षात घेत नितीन पाटील यांनी त्वरीत सदर ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी अनिकेत जाधव आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करून झाड काढून टाकले. यावेळी सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते, केतन खुटले, चंद्रकांत म्हात्रे तसेच रहिवाशी रश्मीन बेलेकर, श्वेता म्हात्रे, गीता रावल, स्नेहा पंडित उपस्थित होते. दरम्यान हे काम त्वरीत मार्गी लावल्याबद्दल रहिवाश्यांनी नितीन पाटील यांचे आभार मानले आहेत.




फोटो: नितीन पाटील पाहणी करताना
Comments