पनवेल मध्ये प्रथमच मोफत प्राणिक हिलींग द्वारे उपचार शिबीराचे आयोजन....
जाणीव एक सामाजिक संस्था आणि मैत्रेय प्राणिक हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने...

पनवेल / प्रतिनिधी : -
जाणीव एक सामाजिक संस्था आणि मैत्रेय प्राणिक हिलींग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये प्रथमच मोफत हिलींग द्वारे उपचार शिबीर शनिवार दि ०१/०७/२०२३ रोजी बल्लाळेश्वर मंदिर सभागृह, वीर सावरकर चौक, पनवेल येथे दुपारी ०४.०० ते सायंकाळी ०७.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.                                                                             प्राणिक हिलींग ही "नो टच, नो मेडिसिन" यावर आधारित आहे.  ही उपचार पद्धत कित्येक वर्षे भारतातच नाही तर इतर अन्य देशातही सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जाणीव एक सामाजिक संस्था चे संस्थापक, अध्यक्ष मा नितीन जयराम पाटील यांच्या तर्फे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ' आपल्याकडे नवी मुंबई सह पनवेल मधीलही अनेक नागरिक उपचार घेत असल्याचे ' प्राणिक हिलींग सेंटरच्या प्रमुख हिलर सौ मेघना कदम आणि सई कुळकर्णी यांनी सांगितले. पनवेलवासीयांनाही या सेवेचा लाभ घेता यावा यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले.                                                                    सदर शिबिरास येऊ इच्छुकांनी ...
प्रसाद हनुमंते 7666327009,
सौ.मेघना कदम 839765907, 
सौ.सई कुळकर्णी 9892715472, 
आशिष सावंत 9321196656 यांच्याशी संपर्क करून आपली नोंदणी करावी, किंवा ऑनलाईन http://titiro.com/5n6jnx6d  या गुगल लिंकवर आपली नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image