ओमया इंडियाच्या माध्यमातून मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर...
ओमया इंडियाच्या माध्यमातून मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर...
पनवेल दि.१९ (संजय कदम) : तळोजा एमआयडीसी मधील नामांकित कंपनी ओमया इंडिया प्रा लि-CSR इनिशिएटीव्ह 22-23 अंतर्गत घोट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत नेत्र तपासणीसह चष्मा वितरण शिबिर आयोजीत करण्यात आले होते. यावेळी गावातील नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावातील जवळपास २०० हुन अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
           ओमया कंपनीच्या माध्यमातून हा उपक्रम दिनांक १७ व १८ जुन हे दोन दिवस घोटगावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन घोट गावातील युवा उद्योजक विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओमया कंपनीचे अधिकारी धनाजी पिंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव भोईर व शाळेचे मुख्यध्यापक संजय पाटील सर यांच्या माध्यमातून शाळा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी घोट गावातील युवक हनुमान निघुकर, एकनाथ कोळी, गिरीश पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





फोटो : आरोग्य शिबीर
Comments