पनवेल एज्युकेशन सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन....
 करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन....
पनवेल दि.२१ (संजय कदम) : पनवेल तालुक्यात शालेय गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पनवेल एज्युकेशन सोसायटीतर्फे दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवार २२ जून रोजी करण्यात आले आहे. 
             पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या याकूब बेग हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज, पी.ई.एस. इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज, तळोजा येथील नॅशनल उर्दू हायस्कूल आणि बारापाडा येथील अँग्लो उर्दू हायस्कूल मधील दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन गुरुवार २२ जून रोजी पनवेल येथील याकुब बेग हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मैदानात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त अशोक लालसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इक्बाल हुसेन काझी भूषवणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. 
फोटो : इकबाल काझी व याकूब बेग हायस्कुल
Comments