भारत पेट्रोलियमची सुरक्षा मोहीम,गॅस धारकांची गॅस तपासणी अनिर्वाय....
भारत पेट्रोलियमची सुरक्षा मोहीम,गॅस धारकांची गॅस तपासणी अनिर्वाय....


पनवेल /प्रतिनिधी
देशात अनेक ठिकाणी गॅस चा वापर आणि सुरक्षा याची माहिती नसल्याने  गॅस धारकांचे अपघात घडले आहेत . या अपघाताचे प्रमाण शून्य आणण्यासाठी भारत पेट्रोलियमने गॅस कनेक्शन ची तपासणी सक्तीची केली आहे . गॅस कंपनीचे वितरक आपल्या प्रतिनिधींद्वारे हि तपासणी घरोघरी जाऊन करणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन भारत गॅस च्या वतीने करण्यात आले आहे .
     देशात अनेक ठिकाणी गॅस कनेक्शन घेतल्यांनंतर ग्राहकांना सुरक्षा हॉज पाईप , सिलेंडर कसा ठेवावा ,गॅस शेगडी कशी ठेवावी व वापरावी याची माहिती आणि सुरक्षा विषयी  माहितीचा अभाव असल्याने अपघात घडत आहे हे अपघात रोखण्यासाठी आणि आपला आणि आपल्या कुटुंबाच्या जिवाच्या सुरक्षतेसाठी गॅस कनेक्शन चे तपासणी करण्यात येणार असून  तशा सूचना भारत पेट्रोलियम दिलेल्या आहेत . या बाबत जिल्हाधिकारी रायगड पुरवठा शाखेच्या वतीने हि गॅस कनेक्शन ची तपासणी अनिर्वाय  असल्याचे पत्रक संबंधित तालुका पुरवठा निरीक्षक आणि गॅस वितरण एजन्सीना दिले आहे .
या सुरक्षा अभियानांअंतर्गत गॅस धारकांनी आपल्या गॅस वितरण  कंपनी कडून तपासणी करूंन घेणे बंधनकारक आहे . हि तपासणी केली नाही आणि काही अपघात झाल्यास त्याला गॅस वितरण कंपनी ,जबाबदार राहणार नाही तसेच हि तपासणी न केलेल्या ग्राहकांचे गॅस  कनेक्शन कंपनी कधी हि बंद करू शकते त्याचप्रमाणे सदर तपासणी पाच वर्षातून एकदा गॅस धारकांनी करणे अनिर्वार्य असून त्याकरिता नाममात्र  शुल्क आकारण्यात येणार असून गॅस धारकांनी सहकार्य करावे असे  रायगड जिल्हा पुरवठा शाखेकडून सांगण्यात आले आहे .
Comments