भाजप प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा...
"बुके नाही नोटबुक" आणण्याचे आवाहन....

पनवेल दि.११ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस 12 जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब गरजूंना धान्यवाटप, जेष्ठ नागरिकांना आधार छडीचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप, आदिवासी वस्तीगृहाला डस्टबिन व आवश्यक वस्तूंचे वाटप, गतिमंद मुलांच्या आश्रमाला डस्टबिन व इतर स्वच्छता साहित्याचे वाटप तसेच अनेक मंदिरांना डस्टबिन वाटप, रुग्णांना फळांचे वाटप, असे अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम तसेच युवांसाठी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन, अश्या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. सायंकाळी ४ ते रात्री १० वा. यावेळेत ते त्यांच्या पनवेल येथील जनसेवा कार्यालयात जनतेसाठी संवाद साधण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.
               
विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त नेहमीच सामाजिक उपक्रम साकारला जात असतात  त्याचप्रमाणे यावर्षीही अनेक उपक्रम साकारले जाणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली. पनवेल मध्ये नेहमीच काहीतरी अभिनव संकल्पना करणारे लोकप्रतिनिधी व राजकीय नेते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे, अनेक नावीन्यपूर्ण योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ते नेहमीच जनतेमध्ये चर्चेत राहिलेले आहेत. नागरिकांशी नाळ जोडलेले युवा म्हणून त्यांची विशेष ओळख निर्माण झालेली आहे. यांच्या या वाढदिवसानिमित्त अनेक हितचिंतकांनी सुद्धा विविध सामाजिक उपक्रम साकारण्याचे ठरवले आहे.  भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण राज्याचे महासचिव असल्याने केवळ पनवेलमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते अनेक सामाजिक उपक्रम राबविणार आहेत. प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला येणाऱ्या हितचिंतकाची संख्या फार मोठी असते व सोबत येताना ते पुष्पगुच्छ घेऊन येत असल्याने हजारो पुष्पगुच्छ जमा होतात. या पुष्पगुच्छतील फुले दुसऱ्या दिवशी कोमेजून जात असल्याने ते पुष्पगुच्छ टाकून द्यावे लागतात तेव्हा मनाला फार वेदना होतात अशी भावना विक्रांत पाटील यांनी व्यक्त केली. आणि म्हणून हितचिंतकांचे प्रेम असे वाया जाऊ नये याकरिता सोबत येताना शुभेच्छा घेऊन याव्या कोणतीही भेट वस्तू आणू नये व काही आणायचेच झाले तर "बुके नाही नोटबुक" असा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला आहे ज्याला नागरिकांकडून व हितचिंतकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. वाढदिसानिमित्त जमा होणाऱ्या सर्व नोटबुक (वह्या) या गरजू विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे. वाढदिसानिमित्त साकारण्यात असलेले सामाजिक उपक्रम व "बुके नाही नोटबुक" ही संकल्पना यासाठी नागरिकांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
Comments