गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक प्रमोद पवार यांची मुंबई येथे नियुक्ती...
गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक प्रमोद पवार यांची मुंबई येथे नियुक्ती...

पनवेल दि.२१ (संजय कदम) : पनवेल शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक प्रमोद पवार यांची मुंबई येथे नियुक्ती झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाचे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
               पनवेल शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक प्रमोद पवार यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. यानिमित्त पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे नुकतेच पनवेल शहर पोलीस ठाण्यात नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक अंजुम बागवान हे गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक पदाचा कारभार पाहणार आहेत.



फोटो : पोलिस निरीक्षक प्रमोद पवार यांचे अभिनंदन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व इतर अधिकारी
Comments