पनवेल मध्ये शिवसेनेला बळकटी शेकडो महिलांचा पक्ष प्रवेश....
पनवेल मध्ये शिवसेनेला बळकटी शेकडो महिलांचा पक्ष प्रवेश....
 
पनवेल ता.9(वार्ताहर) शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथील सुधागड हायस्कूल येथे शनिवार ता.8 रोजी शिवसेनेचा  महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मेळाव्याला हजर शेकडो महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
पनवेल आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत पक्ष प्रवेश सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना महिला सचिव आमदार मनिषा कायंदे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांनी उत्फुर्त पक्षप्रवेश करून शिवसेनेचा भगवा हातात घेतला. 
जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मागिल काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत आहेत. आगामी पनवेल महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिने हे पक्ष प्रवेश पनवेलमध्ये शिवसेनेला बळकटी देत असल्याचे बोलले जात आहे. शनिवारी कळंबोली येथे पक्षाच्या वतीने भव्य महिला मेळावा ठेवण्यात आला होता. या वेळी शेकडो महिलांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शिवसेना सचिव आमदार मनिषा कायंदे यांच्या मुख्य उपस्थतीत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमा दरम्यान वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड जिल्ह्याची पदांची नेमणूक करण्यात आली.यावेळी संध्या पाटील, ज्योती पाटील, गणेश वत्रे, विशाल देवरे, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, रामदास  शेवाळे प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीकांत फाळके आनंद माने, विराट पवार, सुधिर ठोंबरे,सुभाष घाडगे इत्यादी मान्यवर ,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणार असा निर्धार पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
Comments