शिवसेनेची आयुक्तांकडे मागणी....
पनवेल दि.२५ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेत होत असलेल्या नियोजित पदभरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शहरामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे पाणी साचण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर योग्य उपाय योजना करण्याबाबतीत तसेच महानगरपालिकेत होत असलेल्या नियोजित पदभरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे असे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल महानगरपालीकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिले. यासंदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांनी लवकरात लवकर योग्य ते उपाय योजना करून तसेच नोकरी बाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के आदि उपस्थित होते.
फोटो : आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख शिरीष घरत व इतर पदाधिकारी