श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ६०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे करण्यात येणार वाटप....
शालेय साहित्यांचे करण्यात येणार वाटप....

पनवेल दि.२८(संजय कदम): सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने त्यांच्या ४८ व्या वर्षी पनवेल परिसरातील ६०० शालेय विद्यार्थ्यांना पनवेल रेल्वे स्टेशन जवळील साईबाबा मंदिरात येत्या रविवारी दिनांक ३० जुलै २०२३ रोजी दुपारी १२ ते २ या वेळात मान्यवरांच्या उपस्थितीत शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
      
श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साई नारायण बाबा आश्रम, श्री साई बाबा मंदिर पनवेल यांच्यावतीने यांच्या ४८ व्या वर्षी सद्गुरू साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने पनवेल परिसरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांसह शाळेचा गणवेश व दप्तरचे वाटप करण्यात येणार आहे. तरी याचा लाभ पनवेल परिसरातील शेळी विद्याथ्यांनी ग्यावा असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे. 
फोटो: श्री साई नारायण बाबा
Comments