सुनील बहिरा यांच्या प्रयत्नाने पाचशे लोकांनी केली जन आरोग्य योजनेची नोंदणी....
       जन आरोग्य योजनेची नोंदणी....

पनवेल /प्रतिनिधी  
केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे नोंदणी शिबीर माजी नगरसेवक सुनील बहिरा यांनी तक्का येथील गोदरेज स्काय गार्डन येथे आयोजित केले होते या शिबिरात पाचशे हुन अधिक जणांनी केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभासाठी नोंदणी केली .
माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम तक्का विभागात वर्षभर राबविले जातात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम बहिरा गेली अनेक वर्षे करीत आहेत .माणूस कधी ना कधी आपल्या आयुष्यात आजारी पडतो आजकालच्या महागाई च्या जमान्यात औषध उपचार खर्च अधिक वाढला असून तो सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेला आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या उपचारासाठी पाच लाखापर्यंत चा खर्च शासनाकडून मोफत केला जातो मात्र त्यासाठी आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेची नोंदणी करणे आवश्यक असल्याने अशा सर्वसामान्य जनतेसाठी सुनील बहिरा यांनी हा कॅम्प आयोजित केला होता .या करीता पनवेल महानगर पालिका कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले असून नागरिकांनी सुनील बहिरा यांच्यासह पनवेल महानगर पालिकेचे आभार मानले आहेत .
Comments