पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...
पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन...
पनवेल / दि. ९ (संजय कदम) : नवी मुंबई पोलीस आयुक्त परिमंडळ 2 अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाणे अधिनस्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्याचे कुटुंबियांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. 
                पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांचे माध्यमातून नवी मुंबई पोलीस आयुक्तलय परिमंडळ 2 अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाणे अधिनस्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्याचे कुटुंबियांसाठी शंकरा आय हॉस्पिटल, डॉ.डी.वाय हॉस्पिटल ब्लड बॅंक तसेच मुंबई, ठाणे येथील प्रतिष्ठित डॉक्टर यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोफत तपासणी, मोफत औषध वाटप, मोफत नेत्रतपासणी, मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले.  या शिबिरात पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबिय असे एकूण १६३ जणांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेत आपल्या शरीराची तपासणी करून घेतली. यावेळी २८ जणांनी रक्तदान केले. यावेळी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील, डॉक्टर गिरीश गुणे, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल अध्यक्ष रतन खरोल, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ हितेन शाह, सचिव अनिल खांडेकर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर तसेच पोलिसांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.





फोटो : पोलीस अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य शिबिर
Comments