जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप ..
पनवेल : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था पनवेलचे संस्थापक प्रीतम म्हात्रे आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या सहकार्यरुपी प्रेरणेतून रानसई येथील खोंड्याचीवाडी आणि बंगल्याचीवाडी खैरकाठी या आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना तांदूळ, गव्हाचे पिठ, साखर, चहा पावडर, गोडेतेल, मुगडाळ, मीठ, खोबरेल तेल, साबण, लोणचे या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
गेले पंधरा दिवस धो धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. अनेकांचे रोजीरोटीचे साधन हिरावले गेले. आपल्या उदरनिर्वाहकरिता खूप मेहनतीने लागवड केलेल्या भाजी - पाल्यांची रोपं पावसाने कोलमडून गेली. या आदिवासी बांधवांना मदतीचा हात पुढे करत हे सत्कार्य केले.
यावेळी राजू मुंबईकर, स्नेहलजी पालकर, सुप्रसिद्ध निवेदक गोवठणे विकास मंचचे अध्यक्ष सुनिल वर्तक, उपाध्यक्ष वर्तक आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे उरण तालुका सचिव अनिल घरत, वेश्वी गावाचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील, रानसई गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते श्याम लेंडे आणि सर्व आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत सोबतच प्राथमिक शाळांतील आदिवासी बाळ -गोपाळांच्या उपस्थितीत सुंदर व प्रेरणादायी सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.