भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून नवी मुंबई, पालघर, कोकण विभागात मोदींजींच्या 'मन की बात' चे आयोजन..
 मोदींजींच्या 'मन की बात' चे आयोजन..


पनवेल दि.३१ (संजय कदम) : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. भाजप कामगार मोर्चा च्या माध्यमातून सदर कार्यक्रम सामान्य जनतेच्या पर्यन्त पोहोचवण्यासाठी नवी मुंबई, पालघर, कोकण विभागात कामगारांसाठी 'मन की बात' कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.
               नवे विचार आणि नवी ऊर्जा देणारे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. सदर कार्यक्रम सामान्य जनतेच्या पर्यन्त पोचवण्याचे कार्य भाजप कामगार मोर्चा च्या माध्यमातून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कामगार मोर्चाचे  प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांचा सूचनेनुसार केले गेले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम कामगार मोर्चा च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोठ्या ताकदीने राबवला. नवी मुंबई, पालघर व दापोली या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष संजय वासुदेव पवार आणि कोकण अध्यक्ष कमलेश राणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अशोक आंबूरे, कोकण सचिव स्वरूप महाजन, समाजसेवक अशोक नरबागे यांच्या कडून कामगारांसाठी 'मन की बात' कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.





फोटो : भाजप कामगार मोर्चाच्या माध्यमातून मन की बात चे आयोजन
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image