रिक्षाची चोरी.....
रिक्षाची चोरी.....

पनवेल / दि.०८ (संजय कदम) : घरासमोरील रस्त्यावर पार्क केलेली ऑटो रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
          रिक्षाचालक नवनाथ खांडपेकर यांनी त्यांच्या मालकीची २५ हजार रुपये किमतीची आणि एमएच ४५ एसी ३५८० क्रमांकाची रिक्षा ते राहत असलेल्या पनवेल शहरातील अशोक बाग येथील अंकिता बिल्डींग समोर पार्क केलेली होती. मात्र अज्ञात चोरट्याने ती रिक्षा चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार करीत आहेत.
Comments