वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा...
पनवेल / वार्ताहर :-
समाजोपयोगी कामात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मनीषा भोपतराव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षी मनीषा भोपतराव यांनी आपला वाढदिवस जांभिवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील अनाथ मुलांसोबत साजरा केला.यावेळी त्यांनी अनाथ आश्रमातील मुलांसाठी ३० मच्छरदाण्या, तसेच किराणा समान आदी वस्तूंचे वाटप केले.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरुणकुमार भगत,नरेश पाटील सर, ऍड आशाताई भगत, वर्षा पाटील,भारती पाटील, गजानन नारायण भोपतराव, नरेंद्र भोपतराव आदी उपस्थित होते.