रायगड जिल्हा वैश्य समाज संघ शिक्षण समितीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार....
रायगड जिल्हा वैश्य समाज संघ शिक्षण समितीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार...

पनवेल वैभव / प्रतिनिधी - : रायगड जिल्हा वैश्यवाणी समाज संघ,शिक्षण समिती, मनोज महादेव आंग्रे पुरस्कृत, रायगड जिल्ह्यातील वैश्य वाणी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा , जेष्ठ नागरिक संघ सभागृह,ठाणा नाका रोड, पनवेल येथे दि 30 जुलै 2023 रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शंभर हुन अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला पनवेल तालुका वैश्य वाणी संघाच्या महिलांनी आलेल्या पाहुण्यांचे औक्षण करून ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविकात शिक्षण समितीचे अध्यक्ष महेश मधुसूदन पोटे यांनी हा कार्यक्रम का व कोणासाठी आयोजित केला आहे,उद्देश काय ,या विषयी ओघवत्या शैलीत सुंदर विचार मांडले. त्यांच्या हस्ते प्रमुख वक्ते डॉ. संतोष कामेरकर यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व रायगड जिल्हा वैश्य समाज संघाचे अध्यक्ष अशोक भोपतराव यांचा तसेच विलास मनोरे व मनोज महादेव आंग्रे यांचाही सत्कार पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. श्यामल आंग्रे अध्यक्षा(रायगड जिल्हा वैश्य वाणी महिला समाज संघ ),यांचा सत्कार. रसिका राजेंद्र महाजन अध्यक्षा, पनवेल तालुका वैश्य समाज संघ यांनी केला.
         या प्रसंगी प्रमुख वक्ते मा श्री.डॉ. संतोष कामेरकर यांनी मुलांना मोलाचे  मार्गदर्शन केले,त्यांच्यात प्रेरणा कशी निर्माण होईल, या विषयी खूप मौलिक व्याख्यान दिले. महाडचे वैश्य समाजाचे अध्यक्ष .सुधीर मांडवकर  यांनी विदयार्थ्यांना प्रेरणादायी विचार व्यक्त केले. श्यामल आंग्रे यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे विचार व्यक्त केले. रायगड जिल्हा युवक वैश्यवाणी संघाचे अध्यक्ष.मनोज महादेव आंग्रे यांनी समाजातील ज्या मुला मुलींना जी काही गरज लागेल,त्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. रायगड जिल्हा वैश्य समाज संघाचे अध्यक्ष.अशोक भोपतराव यांनी आपल्या तडाखेबंद भाषणाने विद्यार्थ्यांना प्रेरित केले. इ.10 वी तील 55, इ.12 वी तील 25 व पदवीधर 23 मुलांना मान्यवरांच्या हस्ते फोल्डर व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले, विकास वाणी व राजेंद्र चौधरी , सुनील भोपतराव, प्रदीप दलाल,सुनील शेट्ये, महेश आंग्रे, प्रगती दलाल यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image