अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ....
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दॄष्टी फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर जिल्हाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे एस.जी.डी पब्लिक स्कूल खांदा कॉलनी, पनवेल येथे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते उत्तमराव गायकवाड यांच्या हस्ते साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरदासशेठ गोवारी, कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष किशोर देवधेकर सर ,खारघर शहराध्यक्ष शैलेंद्र हंकर, नविन पनवेल शहर उपाध्यक्ष विश्वजीत मारवा, खांदा कॉलनी - पनवेल सचिव श्री संजय परब , संदिप चौटाला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.