आई दोन लहान मुलांसह झाली बेपत्ता...
पनवेल दि.१७(संजय कदम): आईसह तिची दोन लहान मुले कुठेतरी निघून गेल्याने ते तिघेही हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पनवेल जवळील करंजाडे पाडा येथे राहणारे अब्दुल रशीद खान यांची पत्नी मिनारा अब्दुल रशिद खान (वय २६ वर्षे) अंगाने सडपातळ, रंग गोरा, उंची ५ फुट २ इंच, अंगात निळया रंगाचा गाउन घातलेला आहे. केस लांब व काळे, बुरखा घालण्याची सवय, पायात पांढ-या रंगाची सॅन्डल आहे. सोबत मोबाईल फोन आहे तसेच १० वर्षीय मुलगा अब्दुल समी व आठ वर्षीय मुलगा रहीम खान या दोघांना घेऊन घरातील सर्व सामान घेवुन कोनास काहीएक न सांगता कोठेतरी निघुन गेली आहे. या तिघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पो ना. अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधावा
फोटो: बेपत्ता आईसह दोन मुले