विक्रांत पाटील यांची नियुक्ती....
पनवेल दि.१० (संजय कदम) : आगामी लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली असून त्याकरिता `महाविजय २०२४` ही मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. त्याअंतर्गत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमले असून यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघासाठी समन्वयक म्हणून भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र विक्रांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
२०२४ लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर सव्वातीनशे जागा जिंकून स्वबळावर बहूमताने केंद्रात सत्तेची हॅटट्रिक नोंदविण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. त्यानुसार आपले खासदार नसलेल्या जागेच्या तयारीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय प्रचारप्रमुख नेमले होते. त्यानंतर आता समन्वयकांचीही नेमणूक केली. ते लोकसभा निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांत समन्वय ठेवण्याचे काम करणार आहेत. त्याअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून विक्रांत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र विक्रांत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना विक्रांत पाटील यांनी सांगितले की, जेथे आमचा उमेदवार असेल तेथे या निुयुक्तीचा फायदाच आहे. पण, त्याचा तसेच आमच्या संघटनबांधणीचा मित्रपक्षाच्या उमेदवारालाही फायदाच होईल असे सांगितले.
फोटो : विक्रांत पाटील नियुक्ती