तळोजा जेल समोरील तलावात आढळला मृतदेह....
तळोजा जेल समोरील तलावात आढळला मृतदेह....

पनवेल दि.२५(वार्ताहर): तळोजा जेल समोरील तलावात आज सकाळी एक इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
      तळोजा जेल समोरील तलावात आज सकाळी ३० ते ३५ वयोगटातील धडधाकट मजबूत तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांना दिसतात त्यांची तात्काळ खारघर पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्वरित खारघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला. सदर इसमाचे नाव मयांकसिंग असल्याची प्राथमिक माहीत पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान हा इसम ह्या ठीकाणी का आला होता? व त्याचा घातपात केला कि त्याने आत्महत्या केली याचा शोध खारघर पोलीस करत आहेत. 


फोटो: मयत मयांकसिंग
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image