पांडवकडा धबधब्यावर वर्षा सहलीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू...
        अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू...


पनवेल दि. २७ ( वार्ताहर ) : पनवेल तालुक्यातील खारघर येथील पांडव कडा या धबधब्याच्या ठिकाणी आपल्या मित्रांसह वर्षा सहली साठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . 
                      खारघर येथील राहणारे अल्पवयीन ०६ मुले चोरवाटेतून या ठिकाणी गेले होते  वर्षा सहलीचा आनंद आपल्या मित्रासह घेते असताना त्यातील वय वर्ष १३ असलेला हर्ष मिश्रा नावाचा अल्पवयीन मुलगा तेथील दुर्घटनेत मृत्यू झाला आहे . तर त्याचे उर्वरित पाच मित्र सुरक्षित असल्याचे समजते. या घटनेची माहिती खारघर पोलिसांना मिळताच त्यांच्यासह अग्निशामक दलाचे पथक व  रेस्क्यू टीम तेथे पोहचली व त्यांनी अनेक तास शोध कार्य मोहीम हाती घेऊन सदर मुलाचा मृतदेह त्या ठिकाणाहून शोधून काढला आहे  . या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे . 



फोटो - अल्पवयीन मुलाचा मृतदेह
Comments