सात वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार आरोपीस तेलंगणा येथून अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश..
      पनवेल शहर पोलिसांना यश..
पनवेल दि.२२(संजय कदम):    सात वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात  फरार असलेल्या आरोपीला तेलंगणा येथून अटक करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे.
      पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रारदार मोहम्मद लतिक युसुफ यांनी ०३ जून २०१६ रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, ' त्यांचे वडील मो. युसुफ मास्टअली शेख हे पनवेल येथे गेले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन, अज्ञात हत्त्याराने वडीलांचे डोक्यात, कपाळावर वार करुन व रुमालाने गळा ओवळुन त्यांचा खुन करुन वडिलांची ओळख पटु नये याकरिता वडिलांच्या अंगातील पॅन्ट, लायसन्स, आधारकार्ड, ए. टी.एम. कार्ड असे कागदपत्रे काढुन त्याचे प्रेत काळुंद्रे गाव येथील मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकच्या बाजुचे पाण्याचे नाल्यात टाकून दिला होता. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी केलेल्या सुचनेनुसार पोलीस उपआयुक्त पंकज डाहणे, परि ०२, पनवेल व . पोलीस आयुक्त अशोक राजपुत, पनवेल विभाग यांचे आदेशानुसार तसेच पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा वाघमारे, पोशि कांबळे व पोशि घरत असे तपास पथक व पोलीस मित्र राहुल राठोड तयार करण्यात आले होते. नमुद पथकाने गुन्हयातील आरोपी राजू चिन्नप्पा सिंगसानी याचे बाबत शोध घेतला असता तो स्वतःचे अस्तित्व लपवुन मागील ६ ते ७ वर्षापासुन राहत होता. नमुद आरोपीचे कोणत्याही प्रकारचे छायाचित्र अथवा त्याचा मोबाईल क्रमांक उपलब्ध नव्हता. यामुळे नमुद इसमास शोधणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. तेलंगणा राज्यातील मर्कूक पोलीस ठाणेचे एस.आय. डी. शंकर व पोशि मो. साजिद यांचेशी योग्य समन्वय साधुन आरोपीचा ठाव ठिकाणा अविरत दोन दिवस शोध घेवून आरोपी हा एरावली गाव, ठाणा मर्कूक, ता. सिद्धीपेठ, राज्य तेलंगणा येथे राहत असल्याची खात्रीशीर बातमी गोपनिय बातमीदाराकडून प्राप्त झाली. या बातमीच्या अनुषंगाने अतिशय दुर्गम भागात राहत असलेल्या आरोपीची माहिती काढून नमुद पथकाने अतिशय शिताफिने, सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करुन नमुद आरोपीचा सदर गुन्हयातील सहभाग असल्याचे निष्पनः झाल्याने गुन्हयातील आरोपी राजू चिन्नप्पा सिंगसानी याला मर्कुक पोलीस ठाणे हद्दीतील एरावली गावात जावुन ताब्यात घेतले आहे. या आरोपीस प्रथमवर्ग न्यायालय, पनवेल येथे हजर करुन त्याची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करुन तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपीस तळोजा मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे. 




फोटो : आरोपीसह पनवेल शहर पोलिसांचे पथक
Comments