रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद..
चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद..


पनवेल :   स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने को. ए. सो. शालेय संकुलातील के. व्ही. कन्या विद्यालय, व्ही. के. हायस्कूल व इंदूबाई वाजेकर इंग्रजी हायस्कूल मधील 5 वी ते 8 वी च्या विध्यार्थी, विद्यार्थिनी साठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत हजारो विध्यार्थ्यांनी भाग घेतला. क्लबचे कलाप्रेमी सदस्य योगेंद्र कुरघोडे यांच्या संकल्पनेला कला शिक्षक पांडुरंग नेरुरकर , मुनीर मुल्ला, सुजाता गायकवाड तसेच तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापिका प्रगती दलाल , मनिषा पाटील, वैशाली गावित यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले. सदर तिन्ही शाळांतून प्रथम, द्वितीय व तृतीय अशी 18 बक्षिसे स्वातंत्र्यदिनी देण्यात येणार आहेत. सदर चित्रकला स्पर्धेच्या वेळी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष रतन खरोल, सचिव अनिल खांडेकर, माजी अध्यक्ष संतोष घोडींदे, भगवान पाटील, प्रितम कैया, अनिल ठकेकर, योगेंद्र कुरघोडे, ऋषिकेश बुवा यांचे सह शाळेतील शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.
Comments