पनवेल : - जेष्ठ समाजसेवक आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव व जेष्ठ नेते उत्तमराव गायकवाड यांना साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय आण्णा भाऊ साठे समाजरत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.उत्तमराव गायकवाड हे सामाजिक राजकीय आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्व म्हणून गणले जाते स्पष्ट वक्ते ,कुशलसंघटक, झोपडापट्टी वासियांचे लढणारे नेते म्हणूनही परिचित आहेत.कुष्ठरोगी, अनाथ,झोपडपट्टील समस्या सोडविणे नैसर्गिक अपत्तीत अडचणीत आलेल्या लोकांना मदत करणे भ्रष्टाचार ,अन्याय,अत्याचार विरोधात सातत्याने आवाज उठविणे त्यासाठी संघर्ष करणे म्हणूनही ते परिचित आहेत.गरजवंताना सातत्याने मदत करणे हा एक गुण त्यांच्यात आहे आंबेडकरीतील कोणतेही संघर्षमय आंदोलन असो त्यात उत्तमराव गायकवाड नेहमीच आघाडीवर राहिलेले आहेत. नामांतर लढा, रिडल्स लढा, रमाबाई नगर हत्याकांड लढा, खैरांजली हत्याकांड लढा, खर्डा जवखेडा सोनई अत्याचार लढा, आश्या अनेक आंदोलनात त्यांनी हिरारिने भाग घेतलेला आहे इंदुमिलच्या लढा सर्वात प्रथम सिमाजिक समता मंचच्या वतीने विजय कांबळे व उत्तमराव गायकवाड यांनी सुरु केला राज्यत प्रचार व प्रसार केला.शरद पवाराचे कट्टर म्हणून त्यांना ओळखले जाते परंतु आंबेडकरी चळवळीची कास माञ त्यांनी कधीच सोडली नाही. दादर येथील आंबेडकर भवन तोडण्याचा प्रयत्न झाला त्या विरोधातही ते रस्त्यावर उतरले होते नुकतेच झालेले बार्टी ८६१ विद्यार्थी यांच्या फेलोशिप लढ्यात त्यांचे खंबीर नेतृत्व होतेच, परंतु विद्यार्थी बरोबर ५२ दिवस लढा देवून ते आंदोलन यशस्वी केले ८६१ विद्यार्थी यांना सारसकट फेलोशिप मिळवून दिली , मुंबई शहरातील झोपडपट्टीवासियांना सुखसोई मिळाव्यात म्हणून अनेक आंदोलने मोर्चा घेरावो धरणे अत्मदहणाचा ईषारा आदी कार्यक्रम केले झोपडवासियांचे नेते म्हणून बोरीवली ते मंञालय लाँग मार्च काढला असा मोर्चा मुंबईत प्रथमच काढणारे उत्तमराव गायकवाड सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक सेवाभावी संस्थेने सन्मानित केले आहे महाराष्ट्र शासनाने डाँ बाबासाहेब आंबेडकर दलितमिञ कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करुन सामाजिकरत्न आण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानने समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करुन सन्मानित करण्यात येणार आहे.
६ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नावाजलेले कलाकार अंकूश चौधरी, केदार शिंदे जेष्ठ साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन माजी अध्यक्ष प्रा.श्रीपाल सबनीस व अनेक आमदार राजकीय सामाजिक कलासांस्कृतीक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शहिद अरुणकुमार वैद्य सभागृह हॉल उल्हासनगर येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
त्यांना मिळालेल्या पुरास्कारामुळे आणखी एका पुरस्काराची भर पडत आहे पण त्यांच्या चहात्या वर्गात आनंद झाला असून अभिनंदन होत आहे. सुरदासशेठ गोवारी प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस किशोर देवदेकर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनुसुचित जाती जमाती सेल,कोमोठे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले राष्ट्रवादी पदाधिकारी संजय परब शैलेंद्र हैदर विश्वजित पाटवा शैलेश लोंढे,राहुल यमगर्णी सावंत अर्जुन गवळी आदींनी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.