खांदा कॉलनी येथे विविध कार्यक्रम संपन्न...
पनवेल / प्रतिनिधी :
६ ऑगस्ट २३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष व दृष्टी फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री किशोर देवधेकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त दॄष्टी फाऊंडेशन व सारण्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन मेजर डॉ. उद्धव भंडारे सर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या शिबिरामध्ये सुक्षुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या मार्फत मोफत सर्व रोग तपासणी, मोफत इसीजी, मधुमेह, रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच २डी इको व टिएमटी टेस्ट, अँजिओग्राफी सवलतीच्या दरात उपलब्ध केले. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व इतर डोळ्यांच्या आजारांवर उपचार करण्यात आले. टुडे हेल्थ टेस्ट यांच्या कडून मोफत रक्त तपासणी व बीएमआय तपासणी करण्यात आली. तसेच ४७३ लोकांची आयुष्यमान भारत कार्ड (आभा) नोंदणी करुन सर्वांना मान्यवरांच्या हस्ते आभा हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.
सदर प्रस़गी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते उत्तमराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरदासशेठ गोवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल तालुका कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, राष्ट्रवादी स्वयंरोजगार विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग खारघर शहराध्यक्ष शैलेंद्र हंकर, राष्ट्रवादी पनवेल व नवीन पनवेल सचिव संजय परब , राष्ट्रवादी काँग्रेस कामोठे प्रभाग १७ अध्यक्ष सुनिल नांगरे तसेच विविध राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, खांदा कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.