आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी..
बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी..

पनवेल दि.०१(संजय कदम): रस्त्यांच्या कडेला बरेच महिने उभ्या असलेल्या जुन्या बेवारस वाहनांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवकाळातही गणरायाच्या आगमन आणि विसर्जनावेळी ही वाहने अडथळा ठरतात. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी पनवेलकरांनी पनवेल महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
पनवेल परिसरात अनेक ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने धूळखात महिनो महिने रस्त्यांच्या कडेला उभी असतात. त्यांचे मालक वर्षानुवर्षे पुढे येत नाहीत. त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळाही येतो. तसेच पाणी साचल्यामुळे डासांची पैदास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेकडून ही वाहने हटवण्यात येतात. त्यांच्या मालकी हक्कासाठी कुणी न आल्यास ती वाहने संबधित शासकीय खाते जप्त करतात. यापैकी बरीच वाहने ही क्रमांकांविना असतात. बेवारस वाहने पालिकेच्या वॉर्डस्तरावर कारवाई करून हटवण्यात येतात. मात्र त्याची संख्या कमी झालेली नाही. अद्याप पनवेलमधील बऱ्याच भागात बेवारस वाहने उभी आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या जवळील रस्त्यांवर बेवारस वाहने बरीच असून या वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या वाहनांमुळे आगमन आणि विसर्जनाला अडथळे येतात. त्यामुळे अडथळे दूर करण्यासाठी पालिका आणि पोलिसांनी कारवाई राबवावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.



फोटो: बेवारस वाहने
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image