जबरी मारहाण करून चांदीचे कडे घेऊन पसार झालेला सराईत आरोपी गजाआड
पनवेल दि १७,(संजय कदम) : पादचारी व्यक्तीस जबरी मारहाण करून त्याच्या हातातील चांदीचे कडे काढून घेऊन पसार झालेल्या सराईत आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भंवरराम देवाणी (वय २५) हे रेल्वे स्टेशन परिसरातून पायी जात असताना सराईत आरोपी सुरज उर्फ बाबू वाघमारे (वय २२) रा. नवनाथ नगर याने त्याला आपल्या जवळ बोलावून त्याला धमकावून तसेच हाता बुक्याने जबरी मारहाण करून त्याच्या हातात असलेले जवळपास पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे कडे काढून घेऊन तो पसार झाला. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस हवालदार बंटी कुडावकर, पोलीस हवालदार शैलेश जाधव, पोलीस हवालदार मनोज पाटील, पो.ना. विनोद देशमुख, पो. शि, नितीन कांबळे, मोकल, दाहिजे आदींच्या पथकाने नवनाथ नगर परिसरात लपून बसलेल्या या आरोपीस सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.