तलावात आढळला मृतदेह....
पनवेल / दि २४,( संजय कदम) : परिसरातील तलावाच्या पाण्यामध्ये पालथ्या स्थितीत तरंगत असलेला एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्ष असून अंगात पिवळ्या रंगाचा फुल बाह्यांचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट तसेच पायात तपकिरी रंगाचे बूट, पॅन्ट ला काळ्या रंगाचा बेल्ट, आत मध्ये विटकरी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक किरण वाघ यांच्याशी संपर्क साधावा.